गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

0
60

 

रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत खालापूर पोलीस ठाणे आयोजीत कोरोना नियमावली गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा 2021 च्या युकेज रिसॉर्ट,खोपोली येथील सोहळ्यात सामाजिक कार्यात विशेष योगदान दिल्याबद्दल सहजसेवा फाउंडेशनचा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे साहेब यांच्या हस्ते व कर्जत खालापूरचे प्रांत श्री.अजितजी नैराळे साहेब,तहसीलदार आयुबजी तांबोळी साहेब,कर्जत तालुका पोलीस उप-विभागीय पोलीस अधिकारी विजयजी लगारे साहेब,खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. अनिलजी विभूते साहेब,खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. शिरीषजी पवार साहेब,रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कैलासजी डोंगरे साहेब,वाहतूक पोलीस शाखेचे श्री.सुभाषजी पुजारी साहेब यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आला.

यावेळी समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकीय पक्षांचे पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.