२१ नोव्हेंबर आजच्या दिवशी १८७७ साली जगाला ऐकवणारा फोनोग्राफचा थॉमस अल्वा एडिसनने शोध लावला.

0
79
२१ नोव्हेंबर आजच्या दिवशी १८७७ साली जगाला ऐकवणारा फोनोग्राफचा थॉमस अल्वा एडिसनने शोध लावला.
एका शोधामुळे आपलं जगणं संगीतमय झालंय. तो शोध म्हणजे फोनोग्राफ. आवाज रेकॉर्ड करून तो पुन्हा ऐकण्याची सोय या शोधामुळं झाली. माणसाच्या शब्द फिरवाफिरवीला खोटारडेपणाचा आरसा दाखवणारं यंत्र म्हणजे फोनोग्राफ. अमेरिकी शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसनने लावलेल्या या शोधामुळे जगाचं रुपडंच बदललं. आजच्या दिवशी १८७७ मधे एडिसनने जगाला फोनोग्राफ उपलब्ध करून दिला. टेलीग्राफ आणि टेलीफोन यांच्याशी संबंधित प्रयोग सुरू असताना एडिसन यांना हा शोध लागला. २९ नोव्हेंबरला हा शोध सगळ्यांसाठी खुला करण्यात आला. १८८७ मधे फोनोग्राफच्या शोधामधे एडिसन यांनी आणखी भर घातली. १९१२ मधे एडिसन यांचा डिस्क फोनोग्राफ बाजारात आला. त्यानंतर १९२० च्या दशकात रेडिओच्या आगमनाने फोनोग्राफची लोकप्रियता कमी होऊ लागली. रेकॉर्डिंगचं हे तंत्रज्ञान आज खूप पूढे आलंय, पण त्याची सगळी बीज १८७७ मधे आजच्या दिवसात आहेत.