१७ नोव्हेंबर आधुनिक भारतीय जाहिरात विश्वाचे जनक ॲलेक पदमसी यांचा स्मृतिदिन.

0
54
१७ नोव्हेंबर आधुनिक भारतीय जाहिरात विश्वाचे जनक ॲलेक पदमसी यांचा स्मृतिदिन.
जन्म. ५ मार्च १९२८
‘ए भय्या ठीकसे तोलो’ म्हणत भाजी घेणाऱ्या ललिताजी किंवा धबधब्याखालची ‘लिरिल गर्ल’ ही काल्पनिक पात्रे घराघरांत आणि अक्षरश: मनामनांत पोहोचवणाऱ्या जाहिराती करणारे अॅ लेक पदमसी यांची अॅडगुरु अशी ओळख होती. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी विल्यम शेक्सपिअरच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांचे बंधू बॉबी पदमसी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. शेक्सपिअर आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली होती. यानंतर अॅलेक यांनीही अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं. १९८२ मध्ये ‘गांधी’ सिनेमात मोहम्मद अली जिना यांची व्यक्तिरेखा अॅलेक पदमसी यांनी साकारली होती. देशातील टॉप अॅडव्हर्टायझिंग कंपनी ‘लिंटास इंडिया’ची स्थापना त्यांनी केली होती. अॅतलेक पदमसी यांनी तब्बल १४ वर्षे ‘लिंटास इंडिया’चे सीईओपद भूषविले होते. ४० वर्षांपूर्वीच्या काळात १०० हून ब्रँड ‘लिंटास’ने उभे केले होते आणि या साऱ्यामागे कल्पनाशक्तीपासून सादरीकरणाच्या तपशिलांपर्यंत पदमसींचा मेंदू आणि हात चालत असे. हमारा बजाज, लिरील, सर्फ, चेरी ब्लॉसम शू पॉलिश यांसारख्या आकर्षक जाहिराती त्यांनी बनवल्या होत्या. बोमन इराणी यांना थिएटरमध्ये पदमसी यांनी पहिली संधी दिली होती. अॅलेक पदमसी यांना २००० साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होतं. नाट्यक्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी रुपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा तन्वीर सन्मान अॅलेक पदमसी यांना मिळाला होता. अॅलेक पदमसी यांचं १७ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झालं.