१७ नोव्हेंबर बांगलादेशी पार्श्वगायिका रूना लैला यांचा वाढदिवस.

0
138
१७ नोव्हेंबर बांगलादेशी पार्श्वगायिका रूना लैला यांचा वाढदिवस.
जन्म. १७ नोव्हेंबर १९५२ सिलहट बांगलादेश.
रूना लैला यांना ‘क्वीन ऑफ बांगला पॉप’ असेही म्ह्टले जाते. रुना लैला यांनी पॉप पासून गझल पर्यंत प्रत्येक शैलीत आपला ठसा उमटविला आहे. त्यांना खरे नर्तक व्हायचं होतं आणि त्या साठी कथक आणि भरतनाट्यम देखील शिकत होत्या, एकदा मोठ्या बहिणीची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना एक दिवस संगीत स्पर्धेत भाग घ्यावा लागला आणि ती स्पर्धा त्या जिंकल्या.
रूना लैला यांनी वयाच्या १२ वर्षी पाकिस्तानी चित्रपट ‘जुगनू’ साठी आपले पहिले गाणे गायले होते. रुना लैला यांचा जन्म बांगलादेशात झाला. रुना लैला यांचे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पाकिस्तानमध्येच झाले. त्यांचे वडील सय्यद मोहम्मद इमदाद अली हे सरकारी नोकरीत होते आणि कराची येथे त्यांचे पोस्टिंग होते. रुना लैला यांची गाण्याची पहिली मैफल मुंबईत १९७४ साली झाली.
आणि त्यानंतर रुना लैला यांना संगीतकार जयदेव यांनी घरोंदा या चित्रपटासाठी गाणी गाण्याबद्दल विचारले, व पुढे भूपिंदर आणि रुना लैला यांनी गायलेलं घरोंदा या चित्रपटातील दो दीवाने शहर में हे गाणं व दमादम मस्त क़लन्दर हे खूपच लोकप्रिय झाले होते. रूना लैला यांनी जयदेव, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल और भप्पी लाहिरी यांच्या बरोबर काम केले आहे. त्यांची ‘मेरा बाबू छैल-छबीला, मैं तो नाचूंगी…’ और ‘दमा दम मस्त कलंदर…’ ही गाणी व काही बंगाली ‘साधेर लाऊ बनाईलो मोरे’, ‘शिल्पी आमी, तोमादेरी गान शोनाबो’ ही पण लोकप्रिय आहेत. रूना लैला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.