खोपोलीतील दिव्यांग विद्यार्थ्यांची पहा दिवाळी निमित्त कुशल गुणवत्ता ..

0
113

खोपोली..
डॉ. कुंदा आणि सुभाष महादेव दोंदे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुभाष महादेव दोंदे मेमोरियल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर .खोपोली ही 18 वर्षा पुढील गतीमंद मुलांची कार्यशाळा आहे. या शाळेतील मुलांनी दिवाळीसाठी नवीन आकाराच्या व नवीन डिझाइनच्या पणत्या रंगवल्या आहे. आकाश कंदील,पणत्या, लहान कंदील ,उटणे अश्या दिवाळी साठी लागणाऱ्या सर्व वस्तू या शाळेतील अपंग मुलांनी बनवलेल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता निळकंठ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करुन हे कार्य पुर्ण करुन घेतले आहे.पालकांना घरी जाऊन,भेटून पालकांना समुपदेशन केले. मुलांना घरी बसून दिवाळीचे काम कसे करावे याचे प्रशिक्षण निळकंठ मॅडम व त्यांच्या टिमने केले. शाळेतील शिक्षक सुषमा पाटील,अविना बोभाटे ,प्रशांत हडप, संचित हडप या सर्वांच्या मदतीने व पालकांच्या सहकार्याने या अपंग मुलांनी 10,000 हजार पणत्या रंगवल्या आहे . 5000 हजार लहान कंदील बनवले आहेत. लाॅकडाउन मध्ये जिथे सर्व सामान्य मुले घरात बसून व्हिडीओ गेम खेळत होती. त्यावेळी ही मुले पणत्या रंगवण्याचे काम करत होती. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी त्यांना संस्थेचे आधारस्तंभ उल्हास देशमुख यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ.कुंदा सुभाष दोंदे यांनी सर्व जनतेला दिवाळीसाठी मुलांनी बनवलेल्या वस्तू घेवून मुलांना स्वावलंबी बनवायला सहकार्य करा असे आव्हान सर्वांना केले आहे. या मुलांनी बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी संस्थेचे ट्रस्टी मेंबर श्री. संदिप महागावकर ,श्री. संजय महागावकर,श्री.देवेश राजे आणि सर्व ट्रस्टी मेंबर यांचा मोठा वाटा आहे. मुलांनी बनवलेल्या दिवाळी वस्तू मुंबई, डोंबिवली,पुणे,ठाणा , खालापूर, पनवेल या भागातील लोकांनी वस्तू खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले आहे .
आपणही या वस्तू खरेदी करून मुलांना स्वावलंबी बनवायला सहकार्य करू शकता.आपण सर्वांनी मुलांना प्रोत्साहन देवून त्यांचे जीवन प्रकाशाने उजळून दिवाळी साजरी करा असे आवाहन संस्थेच्या मुख्याध्यापिका स्मिता नीलकंठ यांनी केले आहे.