लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर…

0
278


खोपोली..

लायन्स क्लब ऑफ खोपोली ही सामाजिक कार्यात अग्रगण्य असणारी संस्था आहे.नाना विविध उपक्रम संस्थेच्या मार्फत राबवले जातात यावर्षी खालापूर तालुक्यात इको फ्रेंडली गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,घरगुती गणेशोत्सव व लायन्स क्लब खोपोलीच्या सदस्य यांच्या साठी ही स्पर्धा आयोजित केली होती.ऑनलाईन असणाऱ्या या स्पर्धेमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मधून प्रथम क्रमांक हा अल्टा गणेश उत्सव मंडळ,द्वितीय क्रमांक मोरया संस्कृती मंडळ,खोपोली तसेच घरगुती गणेशोत्सव स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांकाचे मानकरी राजश्री मुंदडा,द्वितीय क्रमांक भरत वर्मा,तृतीय क्रमांक ,श्लोक धानोरकर ठरले आहेत.तसेच लायन्स परिवारातील गणपती सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लायन चेतना केजरीवाल तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी लायन नकुल देशमुख हे ठरले आहेत.
सर्व विजेत्यांना दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी बक्षीस वितरण आयोजित करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने सचिव लायन शिल्पा मोदी,प्रोजेक्ट चेअरमन दिपाली टेलर,लायन विकास नाईक,लायन अजय पिल्ले,लायन अनुराधा कट्टी,लायन संगीता पिल्ले यांनी बक्षिसाचे वितरण केले.लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन महेश राठी,खजिनदार लायन अल्पेश शाह यांच्यासोबत लायन निजामुद्दीन जळगावकर व लायन्स पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नाने सदर उपक्रम पार पडला.