बारवईत वाफारा यंत्राचे वाटप

0
37

बारवईत वाफारा यंत्राचे वाटप

रसायनी -राकेश खराडे

सध्या संपुर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे महाभयंकर संकट ओढावले आहे.गेल्या वर्षंभरात अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले.त्यातच सागरी वादळामुळे न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाची प्रचंड आर्थिक व नैसर्गिक हानी होऊन जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. लहानथोरांना या संकटामुळे काही सुचेनासे झाले आहे. शासन आपल्या परीने नागरीकांमध्ये जनजागृती करून अथक उपाययोजना करत आहे.नागरीकही आपापल्या परीने काळजी घेण्याचा प्रयत्न करुन कोरोनाशी चार हात दूर राहून आपला जीव वाचवून प्रपंचाचा गाडा हाकत आहेत.
कोरोना काऴात गरजू गोरगरीबांना काहीअंश दिलासा मिळावा यासाठी
माजी गृहमंत्री बाऴा नांदगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवळ, अभिजित घरत यांच्या मार्गदर्शनाखाली बारवईं ग्रामपंचायत हद्दीत मनसे शाखाअध्यक्ष समीर दळवी, उपाध्यक्ष सचिन पडवळ आणि ग्रामपंचायत सदस्य किर्तीं दळवी यांच्या कडून वाफारा यंत्राचे वाटप करण्यात आले.यावेली दिलीप दलवी, सोमनाथ दलवी,विनोद दळवी आदी उपस्थित होते.मनसे तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवळ यांच्याकडून ठिकठिकाणी कोरोना काळात विविध उपक्रम सुरू असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.