सीड बॉलच्या माध्यमातून जंगलात वृक्षारोपण…

0
72

सीड बॉलच्या माध्यमातून जंगलात वृक्षारोपण…

यंदाच्या पावसाळ्यात सहजसेवेचा आगळा वेगळा उपक्रम.

सहजसेवा फाउंडेशनने यावर्षी सीड बॉलच्या माध्यमातून जंगल भागात वृक्षारोपण करण्याचा अभिनव संकल्प घेतला होता.सहजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात 20 जून 2021 या दिवशी जवळपासच्या जंगल भागात सीड बॉलच्या माध्यमातून नकळतपणे झाडे उगविण्यास मदत करणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.झाडाझुडपात यावेळी असंख्य सीड बॉल टाकण्यात आले.
याची सुरुवात विस्तीर्ण जंगल भाग असलेल्या बोरघाटात खालापूर तालुका वनविभाग व महामार्ग पोलीस मदत केंद्र,बोरघाट,दस्तुरी यांच्या मदतीने करण्यात आली..यानंतर खोपोली येथील जवळच्या जंगलभागात,याक एज्युकेशन सोसायटीच्या आसपास,बीड जांबरूग येथील जंगलात सीड बॉल टाकण्यात आले.
याखेरीज नागपूर,सातारा,सांगली, कोल्हापूर,नाशिक,पुणे,ठाणे,रत्नागिरी जिल्ह्यातही सहजसेवा फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात आपापल्या जिल्ह्यात भाग घेतला.
चला,कळत नकळत वृक्षमित्र बनुया हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद..