बुज हास्य क्लबने वाहन चालकांना वाटप केली रोपे..

0
97

बुज हास्य क्लबने वाहन चालकांना वाटप केली रोपे..

कोरोना काळात अनेकांना अॉक्सिजनची कमतरता भासत असल्याने अनेकांना अॉक्सिजन विकत घ्यावे लागत असल्यामुळे सर्व सामाजिक संस्था -मंडळे, राजकीय पक्ष, सरकारच्या वतीने वृक्ष लागवड करण्याबरोबर त्याचे संगोपन करण्याचे संदेश देत असताना वृक्ष लागवड काळाची गरज ओळखून खोपोली शहरातील बुज हास्य क्लबच्या वतीने जुन्या मुंबई -पुणे महामार्गावरून धावणाऱ्या वाहन चालकांना मोफत रोपे वाटप करीत वृक्ष लागवड करण्याचे समाजप्रबोधन केल्याने बुज हास्य क्लबच्या अनोख्या उपक्रमात अनेक वाहन चालकांनी सहभाग दर्शवत या उपक्रमाचे कौतुक केले.

खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी बुज हास्य क्लब वर्ष अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत गोरगरीबांना मदतीसमवेत समाजप्रबोधनाचे कार्य करीत असताना सध्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात झाली वृक्षतोड आणि त्यामुळे अॉक्सिजनमध्ये निर्माण होणारा तुटवडा लक्षात घेऊन बुज हास्य क्लबच्या वतीने वृक्ष लागवडीची संदेश देण्यात येत आहे.

बुज हास्य क्लबच्या वतीने मुंबई – पुणे महामार्गावर १७ जून रोजी सकाळी ११ वाजता खोपोली शहरालगत जवळपास ५०० रोपे ही वाहन चालकांना वाटप करीत वाहन चालकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिल्याने बुज हास्य क्लबच्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहेत.

याप्रसंगी खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, सामाजिक कार्यकर्ते हरेश काळे,बुज हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल,अध्यक्षा जयमाला पाटील, संध्या पाटील, रविंद्र अवथनकर, दिपक मालुसरे,विजय घोसाळकर, कुलवंत सिंग आदीप्रमुख उपस्थित होते.