खोपोलीतील पोलिसांना पीर योगी भाईनाथ महाराजांनी केले सँनिटायझर, मास्क आणि खाऊचे वाटप

0
70

भर उन्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या खालापूर – खोपोलीतील पोलिसांना पीर योगी भाईनाथ महाराजांनी केले सँनिटायझर, माक्स आणी खाऊचे वाटप

कोरोना विषाणूने महाभयंकर रुप धारणा केल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या वतीने लाँकडाऊन सुरू केला असून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची तपासणीसाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी भर उन्हाच्या कडाक्यात रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असल्याने त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खोपोलीतील महंत मठाधिपती श्री. साईनाथ दरबारचे पीर योगी मठाधिश श्री.श्री.श्री 1008 महंत योगी भाईनाथ महाराज स्वतः रस्त्यावर उतरून पोलिसांना माक्स, सँनिटाझर, पाणी,बिस्कटे आणि फ्रुटी देवून कौतुक केले आहे.

याबाबत महंत योगी भाईनाथ महाराज यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, कोरोना काळात मोठ्या जोखमीने पोलिस अधिकारी व कर्मचारी आपली दिवस – रात्र सेवा करीत असताना कधीकधी त्यांना जेवण व नाश्ता करण्याचे लक्षात राहत नाही. त्यामुळे अशा कर्तव्य दक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समाजाप्रती रुण आणि आभार म्हणण्याच्या दृष्टीने व कोरोना काळात त्यांनी’ स्वतःची काळजी घ्यावी हेतूने सँनिटायझर, माक्स आणी खाऊचे वाटप करण्यात आले असून सर्वानी कोरोना काळात स्वतः बरोबर कुटुंबाची काळजी घ्या असे मत भाईनाथ महाराज यांनी व्यक्त केले.

तर यावर्षीही कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना पोलिसांवर मोठी जबाबदारी असताना ती पोलिस अधिकारी व कर्मचारी सक्षम पार पाडत आहेत. याबाबत कौतुक करण्यासाठी महंत मठाधिपती श्री.साईनाथ दरबारचे पीर योगी श्री.श्री.श्री 1008 महंत योगी भाईनाथ महाराज यांनी खालापूर टोल नाका, दस्तुरी पोलिस चौकी, पाली फाटा, शिळफाटा, खोपोली गावातील पोलिस चौकी अशा विविध ठिकाणी भर उन्हातान्हात उभे असणाऱ्या पोलिसांना माक्स, सँनिटाझर, पाणी, बिस्कटे आणि फ्रुटीचे वाटप करित त्याच्या कार्याचे कौतुक केले

यावेळी महंत मठाधिपती श्री.साईनाथ दरबारचे पीर योगी श्री.श्री.श्री 1008 महंत योगी भाईनाथ महाराज यांच्यासोबत संजय म्हात्रे, भाऊ सणस, गुरव आदि प्रमुख उपस्थित होते.