१० मे – ऊर्दू शायर कैफी आझमी स्मृतिदिन

0
38

१० मे – ऊर्दू शायर कैफी आझमी स्मृतिदिन

जन्म – १४ जानेवारी १९१९
मृत्यू – १० मे २००२

प्रसिद्ध भारतीय ऊर्दू शायर कैफी आझमी उर्फ अख्तर हुसैन रिझवी यांचा आज स्मृतिदिन.

धर्मनिरपेक्षता, समाजवादी विचारसरणीबद्दल आस्था कैफी आझमी यांना होती. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली.

कैफी आझमी यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. त्यांनी लिहिलेला ‘गर्म हवा’ सारखा फाळणीवरचा तरल सिनेमा झाला नाही. ‘नसीम, हीर रांझा, गर्म हवा’ हे त्यांनी लिहिलेले चित्रपट हिंदीतील मानदंड होते.

लहानपणापासून कैफी आझमी तरल संवेदना असलेले कवी होते, त्यांच्याकडे उपजत नेतृत्वगुण होते. धार्मिक नेते न होता ते कम्युनिस्ट बनले याचे कारण त्यांना मानवतेबद्दल आस्था होती. त्यांना शायरी लिखाण करताना शमा, परवाना पेक्षा सामान्य माणसांच्या वेदनांची जाण होती.

भारत सरकार ने १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मानित केले होते.

कैफी आझमी यांना विनम्र अभिवादन !