१० मे – अभिनेता मॅक मोहन स्मृतिदिन

0
44

१० मे – अभिनेता मॅक मोहन स्मृतिदिन

जन्म – २४ एप्रिल १९३८
मृत्यू – १० मे २०१०

बॉलीवूड अभिनेता मॅक मोहन यांचा आज स्मृतिदिन.

मॅक मोहन यांचे खरे नाव मोहन माखीजानी होते. आपल्या करीयरची सुरवात १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटापासून केली.

‘शोले’ सिनेमात सांभा भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणाऱ्या मॅक मोहन यांनी यांनी जवळपास २१८ सिनेमांत काम केले होते. अमजद खान यांनी विचारलेला ‘अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हम पर? व मैकमोहन यांनी दिलेले उत्तर “पूरे पचास… ” हा डायलॉग अजूनही फेमस आहे.

त्यांनी ७० आणि ८० च्या दशकात ‘डॉन’, ‘कर्ज’, ‘जंजीर’, ‘रफू चक्कर’, ‘शान’ आणि ‘खून पसीना’ सारख्या सिनेमांत खलनायक म्हणून काम केले होते.

मा.मॅक मोहन यांचे १० मे २०१० रोजी निधन झाले.