वडगावमध्ये सांडपाणी गटार बांधकामांचे भुमिपुजन

0
22

रसायनी–राकेश खराडे

ग्रुप ग्रामपंचायत वडगांव हद्दीतील मौजे वडगांव येथे बळीराम ठोंबरे यांचे घरापासून ते मुख्य गटारापर्यंत गटार बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते करण्यात आले.वडगाव येथील सांडपाणी गटारांची व्यवस्था व्हावी यासाठी महादेव गडगे हे प्रयत्नशील होते.त्यांनी नागरिकांची समस्या जाणून सदर विकासकाम मार्गी लागावे यासाठी प्रयत्न केले.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून शनिवार दि.८ मे रोजी दुपारी वडगाव मध्ये सांडपाणी गटार कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वडगांवच्या विद्यमान सरपंच गौरी महादेव गडगे, ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे,संदेश मालकर,राजेश पाटील,शिवाजी शिंदे,कल्पना ठोंबरे, सरिता गडगे तसेच मदन ठोंबरे,संतोष पाटील, बळीराम कोंडू ठोंबरे, विष्णू जगन्नाथ ठोंबरे, परशुराम वाघमारे, संदीप शिंदे, आशिर्वाद गडगे,योगेश ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी social distansing तंतोतंत पालन करण्यात आल्याचे दिसून आले.