वडगाव ग्रामपंचायतीकडून अपंग लाभार्थ्यांना 25000 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप

0
38

रसायनी–राकेश खराडे

खालापूर तालुक्यासह रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील 44 लाभार्थ्यांना तसेच दोन अपंग बचत गटांना ५% अपंग कल्याण निधीतून आर्थिक उन्नती व उदरनिर्वाहच्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायत हद्दीतील अपंग लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी २५०००/- इतक्या रकमेचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी परीसरातील दोन महिला बचत गटांनाही लाभ देण्यात आला.हा लाभ गावदेवी अपंग कल्याण बचत गट वडगाव आणि समविचारी दिव्यांग बचत गट वाशिवली यांना मिळाला.यावेळी प्रत्येक अपंग लाभार्थ्यांना प्रति 25000 हजार मिळालेल्या
लाभार्थ्यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच गौरी महादेव गडगे, ग्रामपंचायत सदस्य महादेव कमलाकर गडगे, हरेश भागा पाटील,नंदकुमार दत्तात्रेय पाटील,संदेश जगन्नाथ मालकर,शिवाजी तुकाराम शिंदे, ग्रामविकास अधिकारी रश्मी रविंद्र शिंदे तसेच संदीप शंकर पाटील,संतोष लडकू पाटील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेली social distancing चे पालन करुन वाटप कार्यक्रम पार पडला.यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.