पोलीस मित्र समन्वय समितीतर्फे औषधी वस्तूंचे वाटप…

0
57

पोलीस मित्र समन्वय समितीतर्फे औषधी वस्तूंचे वाटप…

पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा माधुरी गुजराथी यांचा पुढाकार..

पोलीस मित्र समन्वय समिती ही समाजामध्ये नानाविविध उपक्रम राबवून लोकहिताचे सामाजिक कार्य करीत असते. सामाजिक कार्याच्या याच भावनेतून दिनांक 5 मे 2021 रोजी खानापूर आरोग्य केंद्रात पँरासिटेमाँल गोळ्या,सँनीटाझर,हँडग्लोज,कॉटन मास व एन 95 मास्क चे वाटप करण्यात आले.

पोलीस मित्र समन्वय समितीचे अध्यक्ष डाँ.उमरे,सुभाष सोळंकी, विशाल देशमुख तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हाजी अल्सम सैयद यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा माधुरी गुजराथी यांच्या विशेष सौजन्याने खानापूर आरोग्य केंद्र येथे डाँ.गौरव हजारी,पी.जी.मते,स्वाती केंदूरकर,सुजीत राऊत,प्रमिला रणधिर
यांच्या उपस्थित देण्यात आले.यावेळी
पोलीस मित्र समन्वय समितीचे सदस्य दयानंद माने हे उपस्थित होते
लसीकरणसाठी मदत होणाऱ्या या औषधी वस्तूंच्या मदतीबद्दल पोलीस मित्र समन्वय समितीचे आभार खानापूर प्राथमिक केंद्राच्या वतीने मानण्यात आले.
कोरोना सारख्या आजारात आपल्याला समाजाच्या प्रती काही देणे आहे ,आपल्याला शक्य आहे त्या प्रमाणात मदत केली पाहिजे असे प्रतिपादन श्रीमती माधुरी गुजराथी यांनी व्यक्त केले.