रक्तदान शिबिरात 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्फुर्त प्रतिसाद

0
14

राकेश खराडे,रसायनी

रक्तदान शिबिरात 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्फुर्त प्रतिसाद

राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पोयंजे पंचायत समिती विभागप्रमुख नितिन पाटील आणि एमजीएम ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अजिवली हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना रक्ताची असलेली गरज लक्षात घेऊन राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पोयंजे पंचायत समिती विभागप्रमुख नितिन दादा पाटील यांनी सांगितले.यावेळी एकूण 105 रक्तबाटल्यांचे संचयन करण्यात आले आणि रक्तदान करण्याअगोदर रक्तशर्करा, रक्तदाब तसेच रक्तातील इतर तपासणी करून पात्र रक्तदात्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून रक्तदान केल्याचे पहावयास मिळाले.या शिबिरात सोशल डिस्टसिंग चे तंतोतंत पालन करण्यात आल्याचे दिसून आले.यावेळी M.G.M हाॅस्पिटलातील डॉ.सत्यम यांनी नागरिकांना मार्गदर्शन करुन आरोग्यविषयक सल्ला दिला.त्यांच्यासोबत मेडिकल इन्चार्ज राजेश आथर्वे ,आशिष मोहिते आदीं उपस्थित होते.या शिबिराला पिआय रविंद्र दौडकर,तालुका संपर्कप्रमुख अनंताशेठ पाटील, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उपतालुकाप्रमुख जगदिश मते,माजी उपसभापती देविदास पाटील, जिल्हा परिषद संपर्कप्रमुख मोहन लबडे,निलेश बाबरे,पोयंजे पंचायत समिती उपविभागप्रमुख किशोर पाटील,अशोक ठाकूर, महेंद्र गायकर,प्रताप हातमोडे,जयदास पाटील, आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका संपर्कप्रमुख ह.भ.प अनंता पाटील यांच्या सहकार्याने पोयंजे पंचायत समिती विभागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.