खालापूर पोलीस स्टेशनकडून गरजूंना अन्नधान्य व मास्कचे वाटप…

0
64

खालापूर पोलीस स्टेशनकडून गरजूंना अन्नधान्य व मास्कचे वाटप…
खालापूर…
पोलीस हे जनतेचे मित्र असतात याचसोबत कठीण काळात संकटमोचक सुद्धा असतात. कर्तव्याबरोबर सामाजिक भान असलेले अधिकारी वर्ग आपल्या कृतीतून हे दाखवून देतात.खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत कोरोना काळात आपले कर्तव्य बजावताना समाजाला अभिमान वाटावा असे कार्य खालापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घडत आहे.
दिनांक 3 मे 2021 रोजी खालापूर पोलीस ठाणे कडून दत्तक घेतलेल्या शिरवलीवाडी मधील गरजू,एकाकी निराधार महिला,ज्येष्ठ नागरिक, आदिवासी नागरिकांना अन्नधान्य व मास्क यांचे वाटप करण्यात आले.
समाजातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यावेळी खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते,खालापूरच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम,नगरसेवक संतोष जंगम, कानसा वारणा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील व खालापूर पोलीस स्टेशनचे स्टाफ उपस्थित होते.