खालापूरात डिझेल शवदाहिणीचे भूमीपूजन सोहळा पडला पार

0
408

खालापूरात डिझेल शवदाहिणीचे भूमीपूजन सोहळा पडला पार

91 लाख 35 हजार निधी मंजूर

दिनांक 3 मे रोजी रायगड जिल्हाच्या पालकमंत्री ना.कु.आदितीताई सुनिल तटकरे व खासदार श्रीरंग बारणे ह्यांच्या हस्ते खालापूर येथे प्रस्तावित डिझेल शवदाहिणीचे भूमीपूजन कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी पालकमंत्री आदीतीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, प्रातांधिकारी वैशाली परदेशी, तहसिलदार ईरेश चप्पलवार, खालापूरच्या सभापती वैशाली परदेशी, खालापूरचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते, जि.प.सदस्य नरेश पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये, राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष अंकीत साखरे, खालापूरच्या मुख्याधिकारी सुरेखा भगणे, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, माजी नगरसेवक संतोष जंगम, नगरसेवक तथा गटनेते दिलीप मनेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एच.आर.पाटील, राजेश लाड, वैभव भोईर, सतोष गुरव, शिवसेना शहरप्रमुख पदमाकर पाटील आदीप्रमुख उपस्थित होते.