रा स्व संघ जनकल्याण समिती आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

0
43

रा स्व संघ जनकल्याण समिती आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

खोपोली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय हितवर्धक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने ,आयोजित रक्तदान शिबिरास तरुणांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
    लोहाना समाज सभाग्रहात आयोजित या शिबिराचे उद्घाटन जिल्हा संपर्कप्रमुख राकेश कुमार पाठक यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजनाने करण्यात आली, यावेळी जनकल्याण समिती जिल्हा कार्यवाह नितीन भावे , विहिपचे जिल्हा मंत्री रमेश मोगरे ,तालुका कार्यालय अविनाश मोरे, नगर कार्यवाह दीपक कुवळेकर ,संपर्कप्रमुख सुधाकर भट ,कार्यकारिणी सदस्य गौरव तटकरे, मयूर ठोंबरे, सचिन कुंटे , देवेंद्र जाखोटिया, रुपेश मिस्त्री यासह संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते
   अत्यंत नियोजनबद्ध व सर्व नियमांचे पालन करून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या करिता सोशल मीडियावर नोंदणी करण्यात आली, त्यानंतर गर्दी होऊ नये, म्हणून प्रत्येक रक्तदात्यास काही ठराविक वेळेचे अंतर ठेवून वेळ देण्यात आली होती आणि म्हणूनच हे शिबिर यशस्वी होऊन 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 दरम्यान या शिबिराला माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, ऍड राजेंद्र येरुणकर, शहर भाजपाध्यक्ष इंदरमल खंडेलवाल सरचिटणीस हेमंत नांदे ,ईश्वर शिंपी ,युवा मोर्चा सर चिटणीस विनायक माडपे, सिद्धेश पाटील इत्यादींनी शिबिरास भेट देऊन या नियोजनबद्ध उपक्रमाचे कौतुक केले
पनवेलचे श्री साई रक्तपेढीचे डॉक्टर प्रियांका शिनगारे व त्यांचे सहकारी सचिन पाटील, कल्पेश सागवे, गौरी घोसाळकर, रंजना साहू ,चेतन चौधरी, अतिश पाटील ,इत्यादी सहकाऱ्यांनी रक्त संकलनाची कामगिरी बजावली.
सर्व रक्तदात्यास मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात आली
सर्व रक्तदाते
 यांचे जनकल्याण समितीचे जिल्हाकार्यवाह नितीन भावे यांनी आभार
 व्यक्त केले
कॅप्शन फोटो: रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख राकेश कुमार पाठक जनकल्याण चे जिल्हा कार्यवाह नितीन भावे, विहिपचे रमेश मोगरे, तालुका कार्यवाह अविनाश मोरे, नगर कार्यवाह दीपक कुवळेकर, सुधाकर भट, सचिन कुंटे व इतर