खोपोली येथील सामाजिक कार्यकर्त्या जयमाला पाटील यांच्या नातींचा नृत्यात सिंगापूर येथे प्रथम क्रमांक….

0
153

खोपोली येथील सामाजिक कार्यकर्त्या जयमाला पाटील यांच्या नातींचा नृत्यात सिंगापूर येथे प्रथम क्रमांक….
महाराष्ट्र दिन आता विविध देशात नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले महाराष्ट्रीयन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात.सिंगापूर येथेही कोरोनाचे सावट असूनही उत्साहात साजरा केला गेला.
सिंगापूर गंधर्व यांच्या वतीने छोट्या मुलींसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करणात आले. यामध्ये ठाणे येथून सिंगापूर येथे नोकरीनिमित्त 10 वर्षांपासून असलेले श्री.प्रसाद बालेकर व नम्रता बालेकर यांच्या जुळ्या कन्या निष्का व नृती यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सर्वांची मने जिंकली.
या संस्थेच्या वतीने सर्व महाराष्ट्रीय कार्यक्रम थाटामाटात साजरे केले जातात..
खोपोली येथील हास्य क्लब च्या अध्यक्षा व योगा विद्येत पारंगत असलेल्या सौ.जयमाला पाटील यांचे
श्री.प्रसाद बालेकर हे जावई सिंगापूर येथे इंजिनिअर आहेत तर कन्या नम्रता ही MBA असून त्यांनी महाराष्ट्रीयन संस्कृती मुलांच्या मनात जागी ठेवली आहे.
परदेशात आपल्या मुलांनी अर्थमाजनासोबत आपली संस्कृती जपत आनंद साजरा करणे याहून मोठे समाधान असूच शकत नाही,असे भावूक प्रतिपादन सौ. जयमाला पाटील यांनी केले आहे.