महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र सरंक्षण संघटनेचे उपक्रम..

0
36

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र सरंक्षण संघटनेचे उपक्रम..

खोपोली…

महाराष्ट्र संरक्षण संघटना खालापुर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सहजसेवा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेला मोफत वाचनालय या उपक्रमासाठी पुस्तके भेट देण्यात आली. सदर पुस्तके सहजसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्याकडे श्री. सचिन गुरसळ यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आली.

तसेच ऑक्सीजन हा प्राणवायु किती उपयोगी आहे हे या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सर्वाना कल्पना आली आहे. यासाठीच एक पाऊल पुढे टाकत खोपोली परिसरात वृक्षारोपणाचा व संवर्धनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यासाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष निखिल पाटील यांनी यासाठी पुढाकार कार्यक्रम पार पाडला.त्याच प्रमाणे खालापुर तालुका कोषाध्यक्ष तुषार देशमुख तसेच खालापुर तालुका उपाध्यक्ष शिवतेज तावडे यांनी अथक परिश्रम घेतले.