महाराष्ट्र दिन केनियात उत्साहाने साजरा..

0
65

महाराष्ट्र दिन केनियात उत्साहाने साजरा..

खोपोलीतील श्री व सौ संदीप पाटणकर यांच्या कन्यांचे उत्कृष्ट किल्ले सादरीकरण…

केनिया प्रतिनिधी ….

केनियची राजधानी नैरोबी येथे महाराष्ट्र मंडळ, नैरोबी यांच्या वतीने 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतातून केनियात जमलेले मराठी बांधव गुण्यागोविंदाने एकत्रित येत आपली संस्कृती जपत असतात.
खोपोली येथून केनिया येथे जनता विद्यालय, खोपोली व खोपोली तंत्रनिकेतन,खोपोली येथील माजी विद्यार्थी श्री. संदीप दत्तात्रेय पाटणकर हे गेली 15 वर्ष केनियात नोकरी व व्यवसाय निमित्त कार्यरत आहेत.8 वर्ष सीमेन्स या जगप्रसिद्ध कंपनीत ते ब्रँच हेड होते तर गेले 7 वर्षांपासून स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. संदीप व सौ. मुग्धा पाटणकर यांच्या कन्या ऋचा व रमा यांनी किल्ल्याविषयी उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली आहेत. आपला इतिहास हा युवा पिढीच्या मनावर कोरण्याचे कार्य करणाऱ्या या महाराष्ट्रीयन मंडळीचे खरंच कौतुक आहे.
या उपक्रमामधून आम्ही सर्व महाराष्ट्रीय कुटुंब एकत्रित येतो व कामाच्या व्यापातून मराठमोळे कार्यक्रम साजरे करून आमच्या युवा पिढीला महाराष्ट्रीय सण व संस्कृतीची ओळख रहावी,हा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मंडळ, नैरोबीचे अध्यक्ष अजय आपटे व सरचिटणीस सौ. मुग्धा पाटणकर यांनी सांगितले.