खानावळे ग्रामपंचायत उचलणार नागरिकांचा कोरोना खर्च

0
575

रसायनी–राकेश खराडे

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीनजीकच्या खानावळे ग्रुप ग्रामपंचायतीने “माझे कुटुंब माझी जबाबदारी”अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी कोरोना खर्च देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील व माजी उपसभापती देविदास पाटील यांच्या सहकार्याने खानावळे ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतल्याचे उपसरपंच मोहन बालाराम लबडे यांनी सांगितले.
खानावले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची कोरोना चाचणी,रेमडीसीवीर इंजेक्शन,अॅबुलन्स आदी खर्च करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली खानावळे ही ग्रामपंचायत आहे.यासाठी परीसरातील नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी तपासणी खर्चांची पावती ग्रामपंचायतीकडे सादर करावी.तसेच तो कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्यास त्याला हाॅस्पिटलमध्ये अॅम्बुलन्स नेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून सोय केली जाणार आहे.त्याचप्रमाणे रेमडिसीवीर इंजेक्शनचा खर्चही ग्रामपंचायत करणार असल्याचे सरपंच जयश्री सुभाष नाईंक व उपसरपंच मोहन बाळाराम लबडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.