रसायनीत रक्तदान शिबिरास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, राष्ट्रवादी वासांबे विभागाचा उपक्रम

0
69

रसायनी / राकेश खराडे

सर्वात मोठे दान हे रक्तदान असून रक्त निर्माण करता येत नाही.मात्र आपण रक्तदान करुन अनेकांचे प्राण वाचवू शकतो.कोविड – १९ ने गेल्या वर्षभरापासून सर्वंत्र थैमान घातले असून महाराष्ट्रात रूग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. तसेच अल्प प्रमाणात रक्तदान शिबीरे आयोजित होत असल्यामुळे रक्ताचा तुटवडा आणि कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णाला रक्ताची भासत असलेली आवश्यकता पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. त्या अनुशंगाने वासांबे जिल्हा परिषद गट आणि वरद ग्रामीण पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन रा.जि.प महिला व बालकल्याण माजी सभापती उमा मुंढे यांच्याहस्ते पार पडले.या शिबिरात जवळपास 65 जणांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वासांबे जिल्हा परिषद गटात तसेच तालुक्यात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहून अनेक तरुण वर्ग कार्यकर्ते यांनी सकारात्मक विचार करून रक्तदान करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक सामान्य नागरिकाला जाणीव आहे.की आपल्या रक्तादानामुळे एखाद्याचे प्राण वाचले जावू शकेल.या उदात्त विचारांतून तरूण कार्यकर्ते यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येवून हातभार लावला आहे.याप्रसंगी महिला व बालकल्याण माजी सभापती उमा मुंढे ,सरपंच ताईं पवार,माजी सरपंच संदीप मुंढे,रसायनी विभागीय अध्यक्ष अनिल पिंगळे,माजी सरपंच ऋषाली म्हात्रे,माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड,रसायनी विभागीय महिला अध्यक्षा वर्षा पाटील, स्वच्छता कमिटीच्या सुप्रिया गायकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैंदर्गींकर, कैलास म्हात्रे, पांडुरंग पारंगे, नामदेव कोकंबे, प्रल्हाद मुंढे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव अमित शहा, सुधीर शिंदे, संतोष पाटील, देविदास म्हात्रे, शिवदास जगताप, गणेश काले,सकाराम पाटील,नंदू कुरंगले, विनायक मुंढे, विजय चौधरी, दिनेश चव्हाण,कुणाल लाड,संतोष मांडे तर रोटरी ब्ल्ड बॕकेचे डाॕ.प्रकाश दिवे,प्रतिक्षा कुरुंगळे,मंगेश देशपांडे ,किरण देशपांडे, नितेश म्हात्रे,नयन म्हात्रे,योगेश म्हात्रे,रुपेश म्हात्रे,सायराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर पार पडले.यावेळी रक्तदात्यांना रक्तदान केल्याबद्दल माजी सरपंच संदिप मुंढे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी पाहिले.