जंगलात रानमेवा तयार, कोरोना मुळे ही फळे झाली दुर्मिळ,बाजार पेठेत शुकशुकाट

0
200

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १६ एप्रिल, दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आसल्यामुळे प्रत्येक नागरिकांची अंगाची लाही -लाही होत आहे.या उन्हाच्या चटक्या पासून थकवा कमी व्हावे,यासाठी निसर्गाने या ऋतूमध्ये रसाळ फळे व रानमेवा ची निर्माण केली असावी.यामुळे दर वर्षी विविध बाजारात पेठेत जंगलातील रानमेवा दाखल होत असतो.मात्र या वर्षी कोरोना सारखे संकट आल्यामुळे आणी त्यातच संचार बंदि मुळे या वर्षी या रानमेवाची चव दृर्मिळ झाली आहे.
उन्हाळ्याचे आगमन होताच हा रानातील रानमेवा बाजारात येत असल्यामुळे यामध्ये करवंदे ,कैरी ,अंजीर ,काजू,चिंच जांभळे, अदि जंगलामध्ये तयार झालेला रानमेवा मोहपाडा ,खोपोली ,चौक या बाजारात दाखल होत असत या रानमेवामुळे आदिवासी या समाज्याला रोजगार मिळत असतो.तसेच रानातील काळी मैना अजून तयार झाली.नसून हिरवी गार करवंदे म्हणून हिचा ठेचा म्हणून स्वयंपाक करण्यासाठी दैनंदिन जीवनात वापरत उपयोग होत आल्याचे महिला वर्गा कडून सांगण्यात येत आहे.मात्र या वर्षी जंगलातील रानमेवा मिळणे दुर्मिळ झाल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. रुचकर, स्वस्त आणि औषधी असे बहुउपयोगी असलेल्या या रानमेव्याची अनेकांनी भुरळ पडत आहे. दुर्गम भागात राहणारे अदिवासीं बांधवांचे उत्पन्नाचे साधन म्हणून डोंगरातील रानमेवा असून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन तोंडात टाकता येणारा तसेच शरीराला आणि मनाला गारवा देणार्‍या या रानमेव्याला अधिक मागणी दिसत आहे.मात्र संचार बंदि मुळे जंगलातील रानमेवा तयार झाला असून त्याची विक्री होत नसल्यामुळे या रसाळ फळांची चव सध्या दुर्मिळ झाली आहे. उन्हाळ्यामुळे निर्माण झालेली उष्णता आणि वातावरणातील बदल यामुळे शरीराला थकवा येतो. तो दूर करण्यासाठी, उन्हापासून रक्षण व्हावे यासाठी विविध उपाययोजना करत असतो. त्यामध्ये सुती कपडे घालणे, तसेच शरीराला थंडावा देतील असे पदार्थ आहारात ठेवतो. तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा निर्माण होण्यासाठी फलाहार केला जातो. बाजारपेठेमध्ये आंबा,द्राक्षे, फणस, चिक्कू यासारख्या फळांचा बरोबरच करवंद, काजुफळ, तोरणे, यासारख्या रानमेव्याची विक्री मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. असह्य करणार्‍या उन्हामध्ये अगदी पटकन तोंडात टाकता येणार्‍या आणि खायला रुचकर असणार्‍या या रानमेव्यांना लहान मुलांपासून मोठय़ा मंडळीं सर्वाचीच मागणी असते. शरीराला थंडावा देणारा आणि औषधी गुणधर्म असणारा रानमेवा मात्र कोरोना मुळे या वर्षी बाजार पेठेत दाखल न झाल्यामुळे या मधूर रानमेवांची चव या वर्षी प्रत्येकाला मिळेलच असे नाही.

फोटो : जंगलातील रानमेवा चे टिपलेले दृश्य ( छाया : काशिनाथ जाधव ,पाताळगंगा )