खोपोलीत कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करा.. नगराध्यक्षांचे पालकमंत्री आदितीताई यांच्याकडे साकडे..

0
236

 खोपोली शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आँक्सीजन आणि व्हेंटीलेटर बेड रुग्णांना प्राप्त करताना नातेवाईकांची दमछाक होत आहे.या गंभीर समस्येवर सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर नगरपरिषद क्षेत्रासाठी कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करावेत अशी मागणीचे पत्र पालकमंत्री अदिती तटकरे नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी देत मदतीसाठी साकडे घातले आहे.

          शहरात कोविड रुग्णालय उभारावे अशी मागणी जोर धरत असताना रूग्णांसाठी शहरात काय सुविधा देता येतील याविषयावर नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या दालनात मुख्याधिकारी गणेश शेटे,माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नवीनचंद घाटवळ,नगरसेवक मोहन औसरमल,अँड. राजेंद्र येरुणकर, उल्हासराव देशमुख, भाजपचाचे शहर सेक्रेटरी हेमंत नांदे, मनसेचे कौस्तुभ जोशी, डॉ.शेखर जांभळे,बाबूभाई ओसवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्री आदितीताई तटकरे यांना निवेदन पत्र देण्याचा निर्णय झाल्यावर खोपोली शहराची लोकसंख्या १ लाखापेक्षा जास्त आहे.शहरात सध्या १६९४ अँक्टीव रुग्ण आहेत.तर कोविडमुळे ८८ जणांचा मृत्यू झालेला आहे.शहरात दि १४ एप्रिलला २९ तर १५ एप्रिल रोजी १० रुग्ण आढळले होते. कोणताही त्रास नसलेले रुग्ण घरीच उपचार घेत असले तरी गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांना अलिबाग आणि पनवेलला पाठवावे लागते.या ठिकाणीही पुरेसे बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने खोपोली नगरपरिषद क्षेत्रातील रूग्णांसाठी खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून देण्याची विनंती पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.