खालापूर तहसीलदार यांनी केले रक्तदान

0
88

अर्जुन कदम,चौक

खालापूर तहसीलदार यांनी केले रक्तदान

खालापूर तालुक्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी खालापूर येथे स्वतः रक्तदान करून रक्तदान करण्याचे आवाहन केले.

सद्द्या कोविड महामारीमुळे व अन्य रोगांमुळे रक्ताचा पुरवठा कमी झाला असून सर्वत्र रक्ताचा तुटवडा सुरू असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.रुग्णाला वेळेत रक्त पुरवठा न झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी व स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे, त्याला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत असून चौक जिल्हा परिषद व खालापूर नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्याठिकाणी स्वतः तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी रक्तदान केले,व इतरांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ८१ रक्तदाते यांनी रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचविण्याचे पवित्र काम केले.माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील,सरचिटणीस हनुमंत पिंगळे, अध्यक्ष एच. आर.पाटील,युवा नेते संदीप जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.