रिसमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

0
28

रसायनी–राकेश खराडे

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती यावर्षी रिस येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या कार्यालयात साधेपणाने साजरी करण्यात आली. कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अति संसर्गजन्य परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने पण साधेपणाने साजरी करत शासनाच्या अटी शर्ती व नियमांचे पालन करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत व प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करत ही जयंती रिस व रसायनी परीसरात साधेपणाने साजरी करण्यात आली.
दरम्यान रिस कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर उपस्थितांचे स्वागत करुन मान्यवरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.डाॅ बाबासाहेबांच्या महान कार्याचा इतिहास अॅड.डि.टी.दांडगे यांनी उपस्थितांसमोर मांडला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे, बाबासाहेबांच्या कार्यामुळेच आज बहुजन समाजाचा व सर्व जाती धर्माच्या लोकांना आपले हक्क मिळाले आहे असे सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी बोलताना सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सुनील निकाडे यांनी केले.