शासनाने लावलेले निर्बंध जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी-सपोनि.संजय बांगर

0
44

अर्जुन कदम,चौक

शासनाने लावलेले निर्बंध जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी-सपोनि.संजय बांगर

सद्यस्थितीत लावण्यात आलेले लॉकडाउन चे निर्बंध जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत,त्याचे तंतोतंत पालन केलेच पाहिजे असे प्रतिपादन चौक चे सपोनि. संजय बांगर यांनी केले.
सद्द्या राज्यभर लॉकडाउनसदृश्य निर्माण झाले आहे. शासनाने वाढत्या कोरोना संक्रमनावर केलेली उपाययोजना व नवी नियमावली जाहीर केली आहे, त्याचा जास्त प्रमाणात फटका जीवनावश्यक वस्तू विक्रेते सोडून व्यापारी, छोटे-मोठे विक्रेते,सलून-पार्लर,ज्वेलर्स,कपडा व्यापारी, वाईन शॉप,बिल्डिंग मटेरियल सप्लायर,
स्टेशनरी, मोबाईल शॉपी यांना बसला आहे.या स्थानिक प्रशासनाच्या निर्णयावर सर्वप्रकारच्या व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून चौक पोलीस यांनी शासनाच्या नियमांचे पालन न केलेल्या व न करणाऱ्या लोकांवर कारवाई केली व करीत असल्याने चौक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व सदस्य यांनी चौक पोलीस ठाण्यात जाऊन निर्बंध हटविण्यात यावे अशी मागणी केली, त्यावेळी स.पो.नि. संजय बांगर बोलत होते.सद्द्या चौक या ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली आहे, याची आठवण संजय बांगर यांनी करून दिली.यावेळी चौक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पटेल,अविनाश म्हामुंकर,महेश
चौधरी, मंगेश शिंदे,सागर ओसवाल,अजय घरत यांच्या सह अनेक व्यापारी उपस्थित होते.यावेळी व्यापारी यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.