४ कोटीच्या निधी बाबत नगरसेवक अमोल जाधव यांनी मानले खोपोली नगरपरिषदेचे आभार..

0
51

४ कोटीच्या निधी बाबत नगरसेवक अमोल जाधव यांनी मानले खोपोली नगरपरिषदेचे आभार..

खोपोली –
शहरातील अनेक प्रभागात नागरिकांच्या मुलभूत सोईसाठी रस्त्याचा प्रश्न नगरपरिषदेने चांगल्या प्रकारे मार्गी लागला असून पालिका हद्दीतील शिळफाटा नॅशनल हायवे पासून चिंचवली,मस्को कंपनी ते लौजी रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अनेक वर्षांपासून नगरसेवक अमोल जाधव यांनी पाठपुरावा करत सदरील रस्त्याबाबत निधी उपलब्ध करावा यासाठी सातत्याने आपल्या परीने पाठपुरावा करत होते..अखेर खोपोली नगरपरिषद नगराध्यक्षा , मुख्याधिकारी,उपनगराध्यक्षा सर्व नगरसेवक,नगरसेविका यांच्या सहमतीने नगरपरिषद विकास शुक्ल निधी मार्फत ४ कोटी १२ लाखाचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध झाल्याने नगरसेवक अमोल जाधव व स्थनिक नागरिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
चिंचवली रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने नगरसेवक अमोल जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.