दिशा केंद्र संचालित कम्युनिटी अक्शन फोर हेल्थ प्रकल्पाचे तालुका स्तरीय जनसंवाद कार्यक्रम संपन्न

0
27

दिशा केंद्र संचालित कम्युनिटी अक्शन फोर हेल्थ प्रकल्पाचे तालुका स्तरीय जनसंवाद कार्यक्रम संपन्न

दिशाकेंद्र संचालित कम्युनिटी अक्शन फोर हेल्थ या प्रकल्पा अंतर्गत दिनांक २६ / ०३ / २०२१ रोजी कर्जत तालुक्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्र विभागाचे तालुका स्तरीय जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला असून.या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, गावपातळीवरील सरपंच, सदस्य, व गावपातळीवर आरोग्यावर काम करणाऱ्या आशा वर्कर उपस्थित होते.
या कार्यक्रम अंतर्गत गावपातळीवर लोकांना आरोग्य संबंधी येणाऱ्या अडचणी बाबतीत केसेस मांडून संबंधित अधिकाऱ्याकडून त्या अडचणींचे निरसन करून घेण्यात आले. या केसेस अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे उपकेंद्रात येणाऱ्या अडचणी ची मांडणी करण्यात आली तसेच गाव पातळीवर पाण्याचा प्रश्न आहे त्या संबंधी समस्या गावपातळीवरील अधिकार्यासमोर मांडण्यात आल्या. या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी सदरील समस्या सोडविण्यास कटिबंध राहू असे मत त्यांनी व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमास दिशा केंद्राचे कार्यकर्ते उज्जैन शिरसाठे, वैष्णवी दभडे, अनिता जाधव, वैजयंती श्रीखंडे, विमल देशमुख,नेहा कडव, माधुरी कराळे, जगदीश दगडे, प्रेरणा सोनावळे, संतोष देशमुख आदि कार्यकर्ते व ग्रामस्त मोठ्या संखेने उपस्तीथ होते.