सेव्हन स्टार ग्रुप तर्फे बोर्ली येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

0
30

रायगड:-अमूलकुमार जैन

सेव्हन स्टार ग्रुप तर्फे बोर्ली येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे सेव्हन स्टार ग्रुप तर्फे बोर्ली येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे रविवार दिं.28 मार्च 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
सदर व्हॉलीबॉल स्पर्धा रविवार दिं.28 मार्च 2021 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान खेळविण्यात येणार आहे.स्पर्धेत प्रथम येणाऱ्या चोवीस संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे.सदर स्पर्धेचे प्रवेश शुल्क रु.नऊशे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांकास दहा हजार रोख व चषक,द्वितीय क्रमांकास पाच हजार व चषक,तृतीय क्रमांकास दोन जार रोख व चषक त्याचप्रमाणे उत्कृष्ट नेटर चषक व उत्कृष्ट शूटर चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेची प्रवेश शुल्क समीर घारे(भ्रमणध्वनी क्रमांक 9420651693),शब्बो(भ्रमणध्वनी क्रमांक 9284555634),पप्पू (भ्रमणध्वनी क्रमांक 9075115253),किय्यम (भ्रमणध्वनी क्रमांक 9325368708) तसेच सहजान 7741991782 या गुगल पे वर प्रवेश शुल्क जमा करण्याचे आव्हान सेव्हन स्टार ग्रुप व्हॉलीबॉलचे कर्णधार दत्ताराम पाटील,अन्सार चोगले, रविकांत नांदगावकर यांनी आव्हान केले आहे