खोपोलीतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांंसाठी सकाळी सहाची वाशी तसेच एसीबस सेवा सुरू करा

0
31

खोपोलीतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांंसाठी सकाळी सहाची वाशी तसेच एसीबस सेवा सुरू करा,

भाजापाचे सरचिटणीस इश्वर शिंपी यांची मागणी 

नवी मुंबई महानगर परिसरात खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातील बहुतांशी विद्यार्थी महाविद्यालयात तसेच कामानिमित्ताने नोकरदार,आधिकारीवर्ग  दररोज सकाळी जातात.नवी मुंबई महापालिकेची पहिली बस ७.२० वाजता असल्यामुळे पुढे पोहचण्यात विलंब होत आहे.त्यामुळे सकाळी पहिली बस ६ वाजता सुरू केल्यास सर्वजण वेळेत पोहचून प्रवाशांना नाहक त्रास होणार यासाठी सकाळची पहिली बस ६ वाजता तसेच दुपारच्या दरम्यान एसीबस सुरू करण्याचे निवेदनपत्र भाजापाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी नवी मुंबई महापालिकेचे सर्वेसर्वा तसेच आमदार गणेशजी नाईक,पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर,आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडे दिले आहे.

पनवेल,नवी मुंबई महानगरात मेडीकल, अभियांत्रिकी, विविध शाखेचे काँलेज,हाँस्पिटल तसेच कामानिमित्ताने महिला,नोकरदार जात आहेत. नवी मुंबईची बससेवा सुरू झाल्यामुळे रोजचा प्रवास करणे सोपे आणि सहज झाले आहे.वशी खोपोली पहिली बस ७.२० वाजल्यापासून सुरू होत असल्यामुळे पुढे पोहताना उशीर होत आहे.त्यामुळे विद्यार्थी,नोकरदारांना सकाळी ८ वाजण्याच्या आत पोहचण्यासाठी खासगी वाहनांनी जावे लागते यादरम्यान आर्थिक भूदर्ड सोसावा लागत आहे.ही गंभीर समस्या लक्षात घेवून भाजापाचे शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी नवी मुंबई महापालिकेचे सर्वेसर्वा तसेच आमदार गणेशजी नाईक,पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर,आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडे निवेदनपत्र देत सदर समस्यांचा पाढा वाचत विद्यार्थी आणि नोकरदार,महिला यांना सकाळी होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी पहिली बस ६ वाजता बस सुरू करा तसेच उन्हाळ्यात प्रवाशांना गर्मीचा त्रास होत असल्यामुळे एसी बस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई नगरपालिकेने खोपोलीत बससेवा सुरू केल्यामुळे प्रवाश्यांची मोठी आडचण दुर झाली असून सकाळी -६ वाजताची बस आणि दुपारच्या वेळेत एसीबस सेवा सुरू करण्याचे निवेदनपत्र आमदार गणेशजी नाईक यांच्याकडे दिले असून पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर,आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे देखील पाठपुरावा करीत असल्याची माहिती सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.