खालापूरात मनसेची सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात

0
57

खालापूरात मनसेची सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात

संपूर्ण महाराष्ट्र भर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असल्याने मोठ्या प्रमाणावरून या अभियानाला तळागाळातून पसंती मिळत असल्याने अनेकांनी मनसेचे प्रतिनिधित्व स्विकारले असून या अभियानाला खालापूर तालुक्यात 17 मार्च रोजी प्रारंभ झाले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य व्हा – असे म्हणत मनसेनं खालापुरात माणसं जोडायला सुरूवात करून सभासद नोंदणी सुरू केली आहे. या अभियानाची सुरूवात हाळफाटा येथील मनसेच्या खालापूर तालुका जनसंपर्क कार्यालयातून झाली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला संपूर्ण राज्यात सुरुवात झाली आहे. राज्यभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हे अभियान सुरु असून मनसे पक्षप्रमुख स्वत: राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कुटुंबीयांसोबत या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली. या सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील लोकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले.

तर पुढच्या काळात राज्यात विविध निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकत आणि जनाधार भक्कम करण्याच्या दृष्टीने या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असल्याने या अभियानाला खालापूर तालुक्यात रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख जे.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णुक यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ 17 मार्च रोजी झाल्याने तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या अभियानाला खालापूर तालुक्यातील तरुण पिढी अधिक पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे.