किल्ले रायगड पुन्हा एकदा आकार घेतोय, आणि त्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी गाढवे..!

0
25

किल्ले रायगड पुन्हा एकदा आकार घेतोय, आणि त्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी गाढवे..!

गड पायथ्यापासून मोठमोठे दगड आणि वाळू, वाळसुरे खिंडीतून वर जाऊन पोहोचवायचे, पुन्हा खाली यायचे, आणि पुन्हा सामान पोहोचवून खाली यायचे; अशा दोन खेपा हे करतात. जवळ जवळ २०० गाढवे ह्या कामात गडावर रोज ये – जा करतात . त्यांच्या मालकांना देखील त्या सर्वांची नावे अगदी तोंडपाठ. जर काही गाढवे खाली उतरत असतील, आणि सामान घेऊन इतर जर वर चढत असतील, तर त्यांचे मालक त्यांना बाजूला उभे करून, लगेच वर जाणाऱ्यांना वाट मोकळी करून देतात. अशा प्रकारे हे काम गेले कित्येक दिवस सुरू आहे, आणि रायगड हळूहळू नव्याने आकार घेत आहे.