उत्सव कार्यक्रम करताना कोरोना व कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या-अनिल विभूते वरिष्ठ पोलीस निरीक्षक

0
27

(अर्जुन कदम,चौक)

उत्सव कार्यक्रम करताना कोरोना व कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या-अनिल विभूते वरिष्ठ पोलीस निरीक्षक

कोरोना या महामारीने पुन्हा डोके वर काढले असून येणारे उत्सव व धार्मिक कार्यक्रम यात कोरोना नियमांचे व कायद्याचे उल्लंघन  होनार नाही याची प्रत्यकाने काळजी घेऊन पारंपरिक कार्यक्रम करा असे आवाहन खालापूर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केले आहे.

येत्या काही दिवसांत होळी,धुलीवंदन,रंगपंचमी व शिवजयंती हे पारंपरिक उत्सव हे कार्यक्रम होणार आहेत,यात कायदा व सुव्यवस्था, कोरोना नियमांचे पालन, कार्यक्रम कसे करावे, शासनाचे नियम व कायदे,गावागावात वेगवेगळ्या पद्धतीने होणारे कार्यक्रम, तेथील चालीरीती व परंपरा यावर मार्गदर्शन,माहिती देणे व घेणे यासाठी खालापूर तालुक्यातील पोलीस पाटील व शांतता कमिटीची बैठक सर नेताजी पालकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते बोलत होते.यावेळी पोलीस पाटील यांनीही गावस्थरावर येणाऱ्या अडचणी सांगितल्या,रात्री उशिरा होळी लावू नये,डीजे हे वाद्य वाजवताना त्यावर होणारे बीभत्स नाच करून आपल्या सणांचे पावित्र्य नष्ठ करू नये,धार्मिक व सणांचे महत्त्व लक्षात ठेवून वर्तन करावे असे सपोनि.संजय बांगर यांनी केले.रंगपंचमी व धुळवड साजरी करताना डोळ्यांना इजा होणार नाही,शिवजयंती साजरी करताना धार्मिक भावना दुखावू नये यावर एकमत झाले.या सभेला गावचे पोलीस पाटील हे युनिफॉर्म घालून आल्याने बैठकीत वेगळीच छटा निर्माण झाली होती,तर योग्य मार्गदर्शन व अडचण समजून त्यावर सविस्तर चर्चा होत असल्याने आम्ही या बैठकीत बोलू शकलो असे खालापूर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे यांनी सांगितले.
सपोनि.अंधारे,सपोनि जाधव,यासीनभाई भालदार,हेमा चिंबुलकर यांच्यासह पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते,तर लोकप्रतिनिधी व काही मान्यवर यांची गैरहजेरी खटकत होती.