आंबिवली गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लागणार,जिल्हा परिषद शेष फंडातून निधी उपलब्ध

0
32

आंबिवली गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लागणार,जिल्हा परिषद शेष फंडातून निधी उपलब्ध

पाताळगंगा : १० मार्च,खालापूर तालुक्यातील अशी अनेक गावे आहेत की पावसाळा गेला की पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.गावामध्ये असलेल्या विहीर सुद्धा मार्च महिना सुरु झाला की तळ गाठण्याच्या तयारीत असतात.मात्र आंबिवली गावामध्ये असलेली विहिरीचे पाणी दुषिद्ध झाल्यामुळे विहीर साफ केली,मात्र विहिरीचे पाणी खराब होत असल्यामुळे अनेकांना दुरवरुन पाणी अनावे लागत आहे. ग्रूप ग्राम पंचायत सरपंच गोपीनाथ जाधव यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील यांच्या कडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावे आशी मागणी केली असतांना अखेर आज या पिण्याच्या पाण्याचे भूमिपूजन सोहळा करण्यात आला.
रायगड जिल्हा परिषद सदस्या पद्माताई पाटील यांच्या शेष फंडातून या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.यासाठी आज त्यांच्या हस्ते या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला.गेले अनेक महिने खालापूर तालुक्यात विकास कामाचा प्रवाह सातत्याने सुरुच असून आंबिवली गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे महिला वर्गांच्या चेहऱ्यावर समाधानांचे भाव निर्माण झाले आहे.गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याची समस्या असतांना अखेर यावरती पुर्ण विराम पडणार असल्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाणी म्हणजे जल आहे कारण जल है तो कल हम है! या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शिवाय चोवीस तास पाणी उपलब्ध होणार असल्याचे सरपंच,सदस्य उपसरपंच यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले या पाण्याचा भूमिपूजन सोहळा रायगड जिल्हा परिषद सद्स्यां पद्माताई सुरेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.उपस्थित म्हणून राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील,ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव,मा. सरपंच जया जनार्धन जाधव,माजी उप सरपंच रंजनी कांबळे,सदस्या सुवर्णा पाटील,तुकाराम जाधव,रामकृष्ण जाधव,सखाराम जाधव,जनार्धन जाधव,अविनाश कांबळे,शांताराम जाधव,रघुनाथ पाटील,चंदू पाटील,वसंत कांबळे,आत्माराम जाधव,मारुती जाधव,मधुकर जाधव,मनिषा जाधव,शारदा जाधव,कमळ जाधव अदि उपस्थित होते.