११ फेब्रुवारी – भारताचे माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा स्मृतिदिन

0
32

११ फेब्रुवारी – भारताचे माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा स्मृतिदिन

जन्म – १३ मे १९०५ (दिल्ली)
स्मृती – ११ फेब्रुवारी १९७७ (दिल्ली)

भारताचे माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा आज स्मृतिदिन.

फक्रुद्दीन अली अहमद यांचे शिक्षण उत्तर प्रदेश व दिल्ली येथे झाल्या वर ते १९२३ ला इंग्लैंडला गेले. तिथे कैम्ब्रिज मधून उच्च शिक्षण घेतले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून.

१९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. फक्रुद्दीन अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती २९ ऑगस्ट १९७४ साली झाले.

मा.फक्रुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती पदावर असताना त्यांचे ११ फेब्रुवारी १९७७ रोजी निधन झाले.