११ फेब्रुवारी – अभिनेत्री टीना मुनीम यांचा वाढदिवस

0
33

११ फेब्रुवारी – अभिनेत्री टीना मुनीम यांचा वाढदिवस

जन्म – ११ फेब्रुवारी १९५७ (मुंबई)

बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीम यांचा आज वाढदिवस.

टीना मुनीम यांनी फिल्मी करिअरची सुरूवात ७०च्या दशकात ‘देस परदेस’ सिनेमामधून केली. या सिनेमात त्यांनी नैंसी नावाची भूमिका साकारली होती. १९८० मध्ये टीना मुनीम यांनी एकापाठोपाठ कर्ज, मन पसंत, लूटमार आणि एक दो तीन चार या सिनेमांमध्ये काम केले. या सिनेमांत त्यांचा ‘कर्ज’ सिनेमा सुपहिट ठरला. यामध्ये ऋषि कपूरने तिच्यासोबत काम केले होते.

१९८१ साली टीना मुनीम यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले, त्यामध्ये त्यांचे काही सिनेमे हिट तर काही फ्लॉप ठरले. त्याचवर्षी त्यांनी ‘रॉकी’ सिनेमात देखील काम केले होते. या सिनेमापासून मुनीम यांचे नाव संजय दत्त सोबत जोडले गेले होते. त्यावेळी त्यांच्या व संजय दत्तच्या अफेअरची चर्चा बरीच रंगली होती.

१९८३ मध्ये त्यांनी राजेश खन्ना यांच्या सोबत ‘सौतन’ सिनेमात अभिनय केला. या सिनेमाला प्रेक्षकांनी खूप पसंत केले. सोबतच, राजेश खन्ना सोबत टीनाच्या जोडीची देखील बरीच प्रशंसा झाली होती. पडद्या मागील जीवनासोबत तो पर्यंत राजेश खना व टीना मुनीम यांची यांची जोडी जीवनात सुध्दा बरीच रंगात आली होती. या सिनेमांनंतर टीना बॉलिवूडमध्ये बरीच प्रसिध्द झाली होती. ती प्रत्येक वर्षी एकदा तरी थिअटरमध्ये झळकत होती.

नव्वदचे दशक संपल्यानंतर टीनाच्या अभिनयाची जादू सुध्दा कमी झाली. त्यांनी १९९१ मध्ये ‘जिगरवाला’ या शेवटच्या सिनेमात काम केले आणि त्यानंतर ती बॉलिवूड पासून चार हात दूर राहायला लागली.

संजय दत्तला टीना मुनीमचे पहिले प्रेम मानले जाते. परंतु संजयपेक्षा राजेश खन्ना सोबतचे तिचे प्रेमप्रकरण जास्त चर्चेत राहिले. एकेकाळी टीना संजयवर खूप प्रेम करत होती, परंतु दोघांचे हे प्रेमप्रकरण जास्त काळ टिकले नाही. काही वाद आणि कारणास्तव त्यांचे नाते संपुष्टात आले. पडद्यावरील आणि पडद्यामागील जीवनात टीना आणि राजेश यांना सर्वजण एका चांगल्या जोडीच्या रुपात बघायला लागले होते.

टीना मुनीम या अनिल अंबानी यांच्या प्रेमात पडल्या. अनिल अंबानी आणि टीना मुनीम यांच्या प्रेमाला धीरुभाईंसह अंबानी कुटुंबियांचा विरोध होता. एखादी बॉलिवूड अभिनेत्री अंबानी कुटुंबाची सून होईल, ही कल्पनाच मुळात त्यांच्या रुचली नव्हती. कुटुंबाच्या दबावामुळे अनिल व टीना यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. टीना यांना मात्र या निर्णयाचा प्रचंड धक्का बसला होता. दोघे तब्बल चार वर्षे एकमेकांना भेटले नाही.

टीना यांनी बॉलिवुडला रामराम ठोकून इंटीरियर डिझाइनिंगचा कोर्स करण्यासाठी अमेरिकेत निघून गेल्या. नंतर टीना मुनीम यांनी अनिल अंबानी यांच्या सोबत लग्न केले. जय अनमोल व जय अंशुल हे त्यांची मुले आहे.

टीना मुनीम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !