सहज सेवा फाऊंडेशनने केली वंचितासोबत दिवाळी साजरी…

0
44
सहज सेवा फाऊंडेशनने केली वंचितासोबत दिवाळी साजरी…
वर्षभर सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सहज सेवा फाऊंडेशनने यावर्षीही दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली.
दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी  लक्ष्मी पूजनच्या दिवशी पहाटे 6.30 वाजता पाताळगंगा नदी, गगनगिरी आश्रम जवळ,खोपोली येथे भरत जाधव ह्या  मनोरुग्नास  दिवाळीतील नरक चतुर्दशीला उटणे लावून गरम पाण्याने अंघोळ घालून स्वच्छ करून त्याला नवीन कपडे देण्यात आले.यानिमित्त भरत याला फराळ देण्यात आला.दिवाळीचं अभ्यंगस्नान,गरम पाण्याने अंघोळ घालून मनोरुग्णासोबत सहजसेवा फाउंडेशनने लक्ष्मीपूजन साजरे केले तर शहरातील अनेक ठीकाणी जल्लोष सुरू असतांना समाजातील काही घटक मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपली गुजराण करीत आहेत.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सहज शक्य आहे तेवढी सेवा आणि सुविधा पुरवणे हा सहज उद्देश असून खोपोली व परिसरात रस्त्याच्या बाजूला व इतरत्र झोपणाऱ्या निराधारांना अर्थातच  दुर्लक्षितांचा पाडवा गोड होवो यानिमित्ताने पाडव्याच्या दिवशी दिवाळी फराळ,मिठाई व उपयोगी वस्तू देऊन नवीन वर्षाचे सहज स्वागत करण्यात आले.
सदर उपक्रमात सहजसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,धनराज जंबगी,बंटी कांबळे,दुर्गेश देवकर,मनोज रुपवते, बी.निरंजन ,आफताब सय्यद,संतोष गायकर,रुदरेश गौडा,आयुब खान,कल्पेश भिरुड,राहुल शेडगे,रुदरेश गौडा,अजय उमाळे, राकेश दळवी,महेश मेश्राम यांनी सहभाग घेतला. 
या उपक्रमासाठी वर्षी मोरे,माधुरी गुजराथी, जयश्री कुलकर्णी,जीनदत्त झरकर,हेमा चिंबुळकर,दिलीप पोरवाल, सत्यम ओसवाल यांनी  याकामी विषेश सहकार्य लाभले.