सहज सेवा फौंडेशनचा विस्तार….

0
182

सहज सेवा फौंडेशनचा विस्तार….

गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या सहज सेवेचा विस्तार आता महाराष्ट्रभर होत आहे. दिनांक 06 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे येथे पुणे जिल्हा,उस्मानाबाद जिल्हा येथे कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.संस्थेच्या रायगड,नागपूर,नाशिक, धुळे,अहमदनगर,जळगाव,औरंगाबाद, जालना व ठाणे,पूर्व मुंबई जिल्ह्यात तसेच कोकण विभागात शाखा व पदाधिकारी नियुक्त झालेले आहेत.


समाजातील विविध घटकांनी सहयोग दिल्याने आजवर नेत्रदिपक सामाजिक कार्य करण्यात आले आहे. भविष्यातही असेच सामाजिक सहयोग लाभो,असा आशावाद यावेळी सहजसेवा फाऊंडेशनच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ.माधुरी शिरोडकर यांनी व्यक्त केला