बोरघाटात मरणप्राय यातना भोगत असलेल्या वृद्धांची सहज स्वच्छता…. सहजसेवा फौंडेशन खोपोलीत संकटमोचन टीम..

0
58
बोरघाटात मरणप्राय यातना भोगत असलेल्या वृद्धांची सहज स्वच्छता….
सहजसेवा फौंडेशन खोपोलीत संकटमोचन टीम..
खोपोली येथील बोरघाटात परिसरात साधारण आठ दिवसापूर्वी एका वृद्ध इसमास कुणीतरी अज्ञात ईसमांनी वैद्यकीय उपचार करतो असे सांगून गाडीत बसवून अंधाऱ्या रात्रीत बोरघाटात मरण यातना देत सोडून दिले.यावेळी खोपोलिकरांनी त्यांची दोन वेळची जेवणाची सोय तेथेच करण्यात आली.यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर इसमाने आपले नाव अशोक किसन डिग्रे असून आपल्याला कर्जत येथे नेऊन सोडण्यात यावे असे सांगितले.त्याप्रमाणे खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर व सतीश आस्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 30 संप्टेंबर रोजी मनोरुग्ण स्वच्छता उपक्रम राबविणाऱ्या सहजसेवा फौंडेशन, खोपोलीच्या माध्यमातून सदर इसमास पाताळगंगा नदी येथे स्वच्छ करून त्यास जेवण देऊन व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून संस्थेच्या वाहनातून कर्जत येथे सोडण्यात आले.
                       कोरोनाची साथ    असूनही या मोहिमेसाठी सहकार्य करणाऱ्यांचे सहजसेवा फौंडेशन, खोपोलीच्या सचिव सौ. वर्षा मोरे यांनी  धन्यवाद व्यक्त केले.
 या आजच्या सहज सेवेत स्वच्छता दूत म्हणून डॉ. शेखर जांभळे,धनराज जंबगी,बंटी कांबळे,संदेश शेट्ये,आयुब खान, सादिक शेख,महेश मेश्राम, संतोष गायकर,आफताब सय्यद,बी. निरंजन यांनी सेवा पुरविली.संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती माधुरी गुजराथी व तरुण कुमार यांचे विशेष सहकार्य लाभले.
तर कोरोना असूनही हा विशेष उपक्रम राबविणाऱ्या सहजसेवा फौंडेशन, खोपोलीचे आभार खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर  यांनी व्यक्त केले.
भविष्यातही ही मोहिम सुरूच राहील, असे यावेळी संस्थेच्या जनसंपर्क प्रमुख सौ.जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले.