रेकॉर्ड मॅन डॉ. शेखर जांभळे यांची आय.इ.ए. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ज्युरी म्हणून निवड…

0
460
*रेकॉर्ड मॅन डॉ. शेखर जांभळे यांची आय.इ.ए. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ज्युरी म्हणून निवड…*
     खोपोली येथील सामाजिक कार्य करण्यात नेहमीच अग्रेसर असणारे व निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असणारे,सामाजिक क्षेत्रातील भरघोस कार्यातून रायगड जिल्ह्यामधील रेकॉर्ड मॅन असणारे रायगड भूषण डॉ. शेखर जांभळे यांची आंतराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली संस्था आय.इ.ए.बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेच्या मानाच्या ज्युरी पदी निवड झाली आहे .
   डॉ. शेखर जांभळे हे लायन्स क्लब ऑफ खोपोली या मातब्बर सामाजिक संस्थेमध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहतात तर सहजसेवा फौंडेशन या 365 दिवस समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.लॉक डाऊन काळात विविध संस्थेच्या माध्यमातून लागोपाठ 70 दिवसांपेक्षा ज्यास्त दिवस बेदखल कुटुंबांना 38000 जेवणाचे पॅकेट्स वाटप करण्यात ते अग्रस्थानी होते याचसोबत मुक्या जनावरांना देखील निरंतर खाण्याची व पिण्याची व्यवस्था करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता.महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी याची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केलेले आहे.
लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष असताना 3721 मुलांना महात्मा गांधींच्या वेषातून दिलेल्या अहिंसा व स्वच्छता संदेशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे. 
अप्रतिम नियोजन व घेतलेल्या कामात सातत्य,वेगवेगळ्या भाषांवर त्यांचे प्रभुत्व,हसमुख चेहरा ही त्यांच्या नेतृत्व गुणांची ओळख आहे.याचसोबत डॉ.शेखर जांभळे हे कृषीवल दैनिकचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना सहज समाचार व सहज शिक्षण कट्टा यु ट्यूब चॅनेल व सहज शिक्षण या वेब पोर्टल चे मुख्य संपादक आहेत.पत्रकारितेसोबत सामाजिक कार्यात समाजाप्रती त्यांचे योगदान मोठे आहे. सामाजिक कार्यात त्यांनी सिंगापूर येथे डॉक्टरेट मिळविली आहे.  
रायगड जिल्ह्यासोबत महाराष्ट्राची शान असणाऱ्या या माणुसकीच्या डॉक्टरची व  त्यांच्या अनुभवी अफलातून कार्याची दखल घेत ज्युरी पदी त्यांची  निवड ही मोठी आचिव्हमेंट आहे. 
शून्यातून विश्व निर्माण करून समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या डॉ. शेखर जांभळे यांना त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…