कर्जत तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येचे शतक पार !

0
98

कर्जत तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येचे शतक पार !

कर्जत : – नरेश जाधव

कर्जत तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना, दि. २७ जून रोजी २२ कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तर कर्जत तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचे शतक पार झाले असल्याने कर्जत तालुक्यात मोठया प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 


सध्या कर्जत तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच दि. २६ जून रोजी एकूण तीन कोरोना बाधित रूग्णांचा रिपोर्ट आला. त्या मध्ये नेरळ मधिल ४० व ३१ वर्षीय दोन पुरूष व शेलु गावातील ४० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तर दि. २७ जून रोजीं एकाच दिवशी २२ जणांचा रिपोर्ट हा कोरोना बाधित आला आहे. त्या मध्ये नेरळ . मधिल ७० वर्षीय पुरुष, ममदापूर ४२ व २१ वर्षीय पुरुष व ४२ वर्षीय महिला, वंजारवाडी ३९ वर्षीय महिला, कशेळा ३० वर्षीय पुरुष, बोरवाडी ६७, ५०, ४२ व १५ वर्षीय पुरूष व ५० वर्षीय महिला, एकसळ २४ वर्षीय पुरुष तर कर्जत शहर व परिसरातील  ३० वर्षीय महिला, मुर्दे बु. ३२ वर्षीय पुरूष, भिसेगाव ६१ व ६२ वर्षीय महिला, किरवली २९ वर्षीय महिला, दहिवली ७१ वर्षीय महिला ५३ व ३४ वर्षीय पुरुष, विठ्ठळनगर ५६ वर्षीय पुरूष व ४९ वर्षीय महिला, असा समावेश असुन. कर्जत तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ११३ वर गेली आहे. तर ६७ रुग्ण उपचार घेत असुन, आज पर्यंत सहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनवर ४o जणांनी मात करून घरी परतले आहे. तालुक्यात दिवसा आड कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांन मध्ये चिंतेचे वातावरण निमार्ण झाले आहे.