खोपोलीत कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

0
1412

खोपोलीत कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

सांयकाळी पाच नंतर सर्व दुकाने सक्तीने बंद

खोपोली – संदीप ओव्हाळ

       रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना खोपोली शहर कोरोनामुक्त होती,मात्र पनवेल वाशी येथे कामाला जाणाऱ्या कामागारांना कोरोनाची लागत होत शहरात कोरोना बाधीतांचा आकडा 20 वर पोहचला असल्याने खोपोलीकरांचे टेन्शन वाढले असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खोपोली पालिका कार्यालयात सर्वपक्षीय बैठक नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी आयोजित केेेेली होती यावेळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहतील त्यानंतर उघडी असणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे प्रशासनला आदेश देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

           खोपोली शहरात गेली चार दिवसात कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने शहरातील संसर्ग रोखण्यासाठी पालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी शनिवार दि .27 जून रोजी पालिका कार्यालयात सर्व पक्षीय व व्यापारी आणि पत्रकार यांची बैठक आयोजित केली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,उपनगराध्यक्षा विनिता कांबळी,गटनेते सुनिल पाटील,नगरसेवक मनिष यादव,मोहन औसरमल,अमोल जाधव,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कांतिलाल पोरवाल,सुरेश पोरवाल,शिळफाटा व्यापारी संघटनेचे नंदुशेठ ओसवाल, राजू अभाणी,राजेंद्र फक्के,अशोक ठकेकर,आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड,शहर अध्यक्ष चिंतामणी सोनावणे,युवा नेते प्रमोद महाडिक,भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल,चिटणीस हेमंत नांदे,ईश्वर शिंपी,मनसे शहर अध्यक्ष अनिल मिंडे,काँग्रेस शहर अध्यक्ष रिचर्ड जाँन,शेकाप चिटणीस अविनाश तावडे,सेनेचे दिलीप पुरी,अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरूनाथ साठेलकर,सहजसेवा फौंडेशन खोपोलीचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांच्यासह भाजी मार्केटचे पदाधिकारी सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       शहरातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी खोपोली बंद पर्याय असल्याचे दबक्या अवाजात सुर उमटत असतानाच बंद न पाळता सामाजिक अंतर ठेवत विशिष्ट वेळेपर्यत दुकाणे चालू ठेवा जो नियम तोडेल त्यांच्यावर कडक कारवाई करा असे भाजापचे शहर चिटणीस ईश्वर शिंपी तसेच डॉ.शेखर जांभळे यांनी सुचना केली तर रोजी रोटीचा विषय येतो तेथे कंपन्या बंद, बाजरपेठ बंद, परगावचे वगैरे मुद्दे गौण ठरणार आहेत.एक तर पगारात कपात झाली आहे.ऑनलाईन आणि वर्क फ्रॉम होम ऐवजी आता कंपनीत हजर राहणे बंधनकारक केले जात असल्याने नोकरी वाचविण्यासाठी कामावर जाणे आले.त्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता जशी आज आहे तशी उद्या देखील असणार आहे. त्यामुळे बंद हा इलाज नाही.आता कोरोनाशी प्रत्यक्ष लढायची तयारी करावी लागेल असे गुरुनाथ साठेलकर उपस्थितांना सांगितले,मुख्य बाजारपेठ बंद न करता शहर हाद्दीतील दुकाणे पाच नंतर सक्तीने बंद करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राजेंद्र फक्के,कांतिलाल पोरवाल,बाबू पोटे यांनी केली तद्नंतर सर्वानुमते सायंकाळी 5 वाजल्यानंतर मेडिकल,दवाखाने व हाँटेल व चायनिज पार्सल सेवा सुरू राहील तर सर्व दुकाने दुध केंद्र,भाजी,मटण-चिकण व मासळी बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरल्याचे नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी सांगितले तर याबाबतची व्यापारी व नागरिकांमध्ये जनजागृती करा असे आवाहन माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी केले. तर पुढील परिस्थिती बघून रणनिती ठरविली जाईल असे गटनेते सुनिल पाटील यांनी सांगितले.

  शेवटी उपस्थितांचे आभार काँग्रेसचे शहर अध्यक्ष रिचर्ड जाँन यांनी मानले.