कोणी तुमच्या पाया पडल्यानंतर पुढील कामे करावीत…

0
49

कोणी तुमच्या पाया पडल्यानंतर पुढील कामे करावीत…
वयाने मोठ्या लोकांच्या पाया पडणे ही प्रथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे.यामुळे आदर, मान -सन्मान आणि प्रेमाची भावना निर्माण होते. नात्यांमधील प्रेम आणि विश्वास वाढतो. पाया पडण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत.
१) जर तुमच्या कोणी पाया पडले तर त्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात, तसेच देवाचे नाव घ्यावे.
२) जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या पाया पडते त्याचा दोष तुम्हाला लागतो. या दोषातून मुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने पाया पडणा-या व्यक्तीलाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि तुमच्या पुण्यामध्ये वाढ होते.
३) आशीर्वाद दिल्याने पाया पडणा-या व्यक्तीच्या अडचणी दूर होतात.
४) पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातील. त्यामुळे स्ट्रेस दूर होण्यास मदत होते.
५) खाली वाकल्यामुळे डोक्यातील रक्त प्रवाह वाढतो जो डोळ्यांसाठी चांगला असतो.
पाया पडण्यामागे धार्मिक महत्व असे आहे की त्यामुळे आपला अहंकार कमी होतो. वडीलधा-या मंडळीबद्दल आपल्या मनामध्ये समर्पणाची भावना निर्माण होते.
जेंव्हा आपण शरीराने आणि मनाने एखाद्या व्यक्तीच्या पाया पडतो तेंव्हा निश्चितच आपल्या मनाला शांती प्राप्त होते.”