खालापूर पोलिसांनी मोठ्या शर्तीने चोरीचा केला पर्दाफाश.. चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

0
1000

खालापूर पोलिसांनी मोठ्या शर्तीने चोरीचा केला पर्दाफाश.. चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

समाधान दिसले : खालापूर

खालापुर पोलिसांच्या कामगिरीचे होत आहे कौतु6Pक..

खालापूर तालुक्यातील मौजे पौध गावच्या हद्दीत असलेल्या कॉन्गीडन्स गैस प्रा.लि.या कंपनीमध्ये एल.पी.जोगस सिलेंडरच्या मोकळया टाक्या तयार करण्याचे तसेच दुरुस्तीचे काम चालते. दिनांक 12/03/2020 रोजी रात्रीचे वेळी पुन्हा त्याच कंपनीमध्ये 119 सिलेंडर टाक्या चोरी गेल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याबाबत खालापूर पोलीस ठाण्याकडे गुन्हा रजि.नंबर 102/2020 भा.द.वि.स.कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीनी कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता.त्या दृष्टीने मा. पोलीस अधीक्षक, श्री.अनिल पारस्कर सो, तसेच मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन मुंजाळ सो, यांनी तपासाबाबत योग्य
त्या सुचना दिल्या. तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.रणजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली असता कंपनीमध्ये कोठेही सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावलेले दिसुन आले नाहीत. तसेच घटनास्थळावर आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. तसेच कंपनीचे पाठीमागील बाजुस लाईट नसल्याने वॉचमन रात्रीचे वेळी कंपनीचे पाठीमागील बाजुस फेरी मारत नसल्याचे तपासादरम्यान दिसुन आले. त्यानंतर कंपनीचे आजुबाजुची परिस्थिती पाहीली असता कंपनीचे पाठीमागील बाजुस असलेले कम्पाऊंड पुर्णपणे तुटलेले आहे. तसेच पाठीमागील बाजुस नदी असल्याने कंपनीतील सिलेंडर टाक्या कोणत्या मागनि चोरीस गेल्या याची काहीच माहीती मिळत नव्हती.

तसेच अशाच प्रकारे चोरीची घटना यापुर्वी 07/03/2020 रोजी ही घडलेली होती. त्यावेळी 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे कम्पाऊड मध्ये प्रवेश करून कंपनीध्ये ठेवलेले 05 सिलेंडर टाक्या चोरुन नेले बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात होती. त्या बाबत खालापूर पोलीस ठाण्याकडे गुन्हा रजि नंबर 66/2020 भा.द.वि.स.कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, या दोन्ही घटनांमुळे खालापूर पोलीसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

त्यानंतर सदर चोरीस गेले मालाचा व चोरट्यांचा शोध घेण्याकरीता पोलीस ठाणे स्तरावर 03 तपास पथके तयार केली. व वेगवेगळ्या मार्गांनी चोरीस गेले मालाचा व आरोपीचा शोध सुरू केला. तसेच त्याबाबत खब-यांनाही माहिती दिली.

त्यानंतर विश्वासु खब-याने पोलीस नाईक नितीन शेडगे, व रणजित खराडे यांना माहीती दिली की, सदरची चोरी ही वणवे येथील राहणारा महादेव वामन वाघमारे याने व त्याचे साथीदारांनी केली असल्याचे सांगितले.त्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे याचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे,पोलीस हवालदार योगेश जाधव,पोलीस नाईक नितीन शेडगे, रणजित खराडे, सचिन व्हसकोटी,हेमंत कोकाटे व पोलीस शिपाई दत्तात्रेय किसबे,शव चालक जगदीश बाप यांचे पथकाने प्रथम वणवे येधील आरोपीत यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सुरुवातीला चौकशी केल्यानंतर सुरवातीला तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता तसेच त्याचे साथीदारांची नावे सांगत नव्हता. त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने सुरवातीला त्याचे कर्जत येथील साथीदाराचे नाव सांगितले. त्यानंतर त्यास लाखरन,कर्जत येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघाना वेगवेगळे ठेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता दोघाचे बोलण्यामध्ये तफावत असल्याचे दिसुन आली. त्यामुळे दोन्ही आरोपींकडे चौकशी करण्याचे सातत्य व कौशल्य वापरल्याने त्या दोघांनी त्यांचे इतर आणखी 05 साथीदार आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर त्यांना लोहोप, कर्जत, हाळ खुर्द, मोहपाडा, या ठिकाणासुन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचेकडे सातत्यपुर्ण चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेला मात कोठे विक्री केला आहे. याबाबत विचारपुस केली असता त्यांनी चोरी केलेला माल देहरोड, पुणे, मुंब्रा, या ठिकाणी विक्री केल्याचे सागितले. त्यामध्ये आज पर्यंत 79 सिलेंडर टाक्या जमा करण्यात आल्या असुन आज पर्यंत चोरी करणारे 05 आरोपी व चोरीचा माल खरेदी करणारे 02 आरोपी यांना अटक कण्यात आली आहे. तसेच आरोपीत यांनी चोरीचा माल वाहुन नेण्याकरीता ज्या वाहनाचा वापर केला ते वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.

सदर गुन्ह्यामध्ये आणखी आरोपीत वाढण्याची शक्यता आहे. सदर आरोपीत यांना दिनांक 17/06/2020 रोजी अटक करण्यात आला असुन त्यांची सुरुवातीला दिनांक 22/06/2020 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली असून त्यानंतर पुन्हा पोलीस कस्टडी रिमांड वाढवुन दिनांक 25/06/2020 रोजी पर्यंत मिळाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री. शेखर लव्हे हे करीत आहेत.