खोदकाम करताना सापडली प्राचीन शिव पिंड…
खालापूर.

अर्जुन कदम
खालापूर येथील शेतात शिवलिंग सापडल्याने परिसरातील लोकांनी दर्शनासाठी धाव घेतली.

खालापूर येथे जेसीबीच्या सहाय्याने  मातीची लेवल करीत असताना शिवलिंग नजरेस पडले.जेसिबी चालकाने ही बाब नविनचन्द्र घाटवळ यांच्या निदर्शनास आणून दिली.नविनचन्द्र यांनी हि बाब खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना कळविल्यानन्तर त्यांनी घटनास्थळी भेट दिली.मातीतील शिवलिंग स्वच्छ करून त्याची पूजा व दुग्धभिषेक करण्यात आला.ही बाब परिसरातील जनतेला कळल्यावर शिवलिंग दर्शन घेण्यासाठी धाव घेतली आहे.(खालापूरचे तहसीलदार शिवलिंगवर दुधाचा अभिषेक करताना )