खोपोली येथील सह्याद्री इलेक्ट्रिकल या व्यवसायास 50 वर्ष पूर्ण..

0
1203

खोपोली येथील सह्याद्री इलेक्ट्रिकल या व्यवसायास 50 वर्ष पूर्ण..

खोपोली…
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खोपोली शहरातील दिनांक 30 मे 1970 साली शुभारंभ झालेल्या सह्याद्री इलेक्ट्रिकल या इलेक्ट्रिकल वस्तूंचे विक्री करणाऱ्या दुकानास दिनांक 30 मे 2020 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली.कोरोना व्हायरसमुळे साधेपणाने साजरा करीत असलेल्या या दिनानिमित्त येणाऱ्या ग्राहकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
घेवरचंद सुरजमल ओसवाल यांनी लावलेल्या या व्यावसायिक रोपट्याचे आज विशाल वृक्षात रूपांतर झालेले पहावयास मिळते. रायगड जिल्ह्यात Anchor या नामांकित कंपनीचे उत्पादन विकण्यात No 1 म्हणून सह्याद्री इलेक्ट्रिकल हे ओळखले जातात. नानाविविध विद्युत कंपन्यांचे उत्पादन विकताना विश्वास व सुरक्षा या दोन गोष्टीने सह्याद्रीने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. खोपोली गावाच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी हे दुकान असल्याने तालुक्यातून अनेकजण या ठिकाणी इलेक्ट्रिकल वस्तू विकत घेण्यासाठी येतात. या दुकानाचे घेवरचंद ओसवाल यांच्या सोबतीने त्यांचे पुत्र नरेश,जितेंद्र व विक्रम ओसवाल यांनींही ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरविला व आता तिसरी पिढी म्हणजेच नितीश जितेंद्र ओसवाल व प्रतीक जितेंद्र ओसवाल व ललित सोमलानी तसेच स्टाफ हे व्यवसाय अधिक जोमाने वृद्धिंगत करीत आहेत. खोपोली गावात सह्याद्रीच्या अजूनही दोन शाखा कार्यरत आहेत.

ओसवाल कुटुंबियांचे खोपोलीच्या जडणघडणीत व सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. जितेंद्र ओसवाल हे खोपोलीतील नामांकित लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे माजी अध्यक्ष असूनही आजही लायन्स क्लब व जैन सेवा संघटनेच्या माध्यमातून समाजसेवेत अग्रेसर असतात..
व्यवसाय व सेवा या दोन्ही मध्ये अग्रेसर असणाऱ्या सहयाद्री इलेक्ट्रिकल यांना सुवर्णमहोत्सवी दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..