तहसील व पोलिसांच्या कार्याचे पारले कंपनी कडून सन्मान.

0
183

तहसील व पोलिसांच्या कार्याचे पारले कंपनी कडून सन्मान…

खोपोली…
आज देशावर कोव्हिड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्व एकजीवाने विषाणूच्या संस॔गाशी मुकाबला करत आहोत पण त्यात अशा काही विशेष व्यक्ती आहे की त्या आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र समाजसेवा करीत आहेत अशा महान व्यक्तींचा कंपनीच्या वतीने एक सामाजिक बांधीलकी जपून दिनांक २० मे २०२० रोजी सन्मान करण्यात आला.
खालापूरचे तहसीलदार ईरेश चप्पलवार,खालापूर तालुक्याचे पोलिस उप अधिक्षक डॉ. रणजित पाटील,खालापुर तालुक्याच्या निवासी नायब तहसिलदार कल्याणी मोहिते- कदम,खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. धनाजी क्षीरसागर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पारले बिस्कीट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक- मानव संसाधन किशोर शेळके व त्यांचे सहकारी यांना सन्मानित केले..
महसूल व पोलीस यंत्रणा यांनी चोखपणे काम कोरोना व्हायरस पासून खबरदारी घेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे,या सर्व कोरोना योद्धा यांना पारले परिवारातर्फे मनःपूर्वक धन्यवाद ,अशी प्रतिक्रिया यावेळी पारले कंपनीचे व्यवस्थापक- मानव संसाधन किशोर शेळके यांनी व्यक्त केली.